नाकोडा ज्वेलर्समधील लाखांच्या मुद्देमालावर चोरट्यांचा डल्ला 

पुणे – औंध परिसरातील नाकोडा ज्वेलर्सवर गुरुवारी पहाटे दरोडा पडला आहे. चोरटयांनी शटर उचकटून ३०-३५ किलो चांदी तर सोने १ किलो असा माल लांबवला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

माहितीनुसार, चोरट्यांनी दुकानाचे शटर उघडून दुकानात प्रवेश केला. यानंतर दुकानात असलेले सोन्यांचे दागिने व इतर मुद्देमाल चोरट्यांनी लांबवला. परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ही घटना कैद झाली आहे. दरम्यान, पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.