लुधियाना : इंडिया इन्फोलाइन फायनान्स लिमिटेड (आयआयएफएल) कंपनीच्या शाखेत 30 किलो सोन्यावर चोरांनी डल्ला मारला. हि घटना सोमवारी सकाळी गिल रोड स्थित (आयआयएफएल) कंपनीच्या शाखेत घडली.
सविस्तर माहिती अशी कि, सोमवारी सकाळी एका कारमधून आलेल्या 5 तरुणांकडून हि लूट करण्यात आली. 30 किलो सोन्यासह त्यांनी 3.5 लाख रुपयांची शाखेतील रोकड पळवली. लुटलेल्या सोन्याचे मूल्य अंदाजे 13 कोटी रुपये आहे. दरोडेखोरांकडे पिस्तुल आणि धारदार शस्त्रे असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली.
घटनेच्या वेळी कार्यालयात मॅनेजर हरमीत सिंग यांच्यासह अमित, मोहम्मद अझर, गुरप्रीत कौर आणि कर्मचारी उपस्थित होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त राकेश अग्रवाल, डीसीपी हरीश डायमा, डॉग पथक, फिंगर प्रिंट एक्सपर्ट यांची टीम घटनास्थळी पोहोचली असून पुढील तपास चालू आहे.