बारामती – बारामती परिसरात घरफोडी करून धुमाकुळ घालणाऱ्या आरोपीला बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाने जेरबंद करत ५ लाखाचे मुददेमाल हस्तगत केला असून घरफोडीचे ९ गंभीर गुन्हे उघडकीस आणले आहेत.
बारामती तालुका पोलीस स्टेशन चे हृददीत गेले तीन महीन्यापासुन घरफोडी चोरीचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे जनमानसात तनावाचे वातावरण निर्माण झाले होते. घरफोड़ी उघड करणे पोलीसासमोर मोठे आव्हान होते. पोलीस निरीक्षक महेश हवाण यांनी गुन्हे शोध पथकाच्या साहाय्याने मोहीम राबवली. सक्त नाईट राउंड, कोबिंग ऑपरेशन, तसेच माहीतगार गुन्हेगार चेक करणे गुन्हा पडले ठिकाणचे सिसीटिव्ही फुटेज याबबतीत लक्ष केंद्रीत करून बातमीदारामर्फत बातमी मिळविणेबाबत मार्गदर्शन केले.
घरफोडी घडले ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज हस्तगत करून फुटेजचे आधारे गुन्हेगाराचा छडा लावला. निग-या उर्फ संजय देविदास भोसले याला सापळा रचुन त्यास ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने बारामती परीसरातील सुर्यनगरी ,तांदुळवाडी ,बजारवाडी या परीसरात त्याचे आणखी दोन साथीदारासह एकूण ९ घरफोडया केल्याची कबुली दिली.
सदर घरफोडीत चोरी गेले मालापैकी सोने, चांदीचे दागिने, रोख रक्कम असा एकुण ५ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करणेत आला. सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहीते, उपविभागिय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार राहुल पांढरे, नंदु जाधव, विजय वाघमोडे, विनोद लोखंडे, चालक बापुराव गावडे, अनिकेत शेळके यांनी केली आहे.