फिर्यादीच निघाला चोर

नगर-पारनेर तालुक्‍यातील ईकॉम एक्‍सप्रेस प्रा. लि. कुरिअर सर्व्हिस बंद कार्यालयाचे शटर उचकाटून रोख रक्कम व अन्य वस्तू चोरून नेणारे दोघे पोलिसांनी ताब्यात घेतले असून, फिर्यादीच चोर निघाला असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

व्यवस्थापक किरण भास्कर कदम व प्रशांत शिंदे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, ईकॉम एक्‍सप्रेस प्रा. लि. या कुरिअर सर्व्हिस कार्यालयाचे बंद शटर उचकाटून आत प्रवेश करून रोख रक्कम अन्य नंबरच्या व किंमतीच्या वस्तू संमतीशिवाय लबाडीच्या हेतूने स्वतःचे आर्थिक फायद्याकरिता चोरून नेले आहे.

हे सर्व तक्रारदार व फिर्यादी ईकॉमचे व्यवस्थापक भास्कर कदम व प्रशांत शिंदे यांनीच केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले . त्यांच्याकडून विविध कंपनीचे पाच मोबाईल अंदाजे 75 हजार रुपयांचे, एक लेडीज ड्रेस, इलेक्‍ट्रिक शेगडी 5 हजार रुपये व 47 हजार 500 रुपयांची रोख रक्कम असा एकूण 1 लाख 27 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यांनी अनेक ठिकानी अशा प्रकारे गुन्हे केले असल्याचेही पोलीस सुत्राकडून सांगण्यात आले आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील व उपविभागीय पोलिस अधिकारी मनिष कलवानिया, पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली बोत्रे, पदमणे, विनोद बोरगे, शिवाजी कावडे, महेश आव्हाड व अपर पोलीस अधीक्षक यांच्या पथकातील राठोड, शिंदे, आदींनी कारवाई केली. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक बी. यु. पदमणे, वैद्य हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.