“ज्या ताटात खातात, त्याच ताटात छेद करतात’

जया बच्चनने केला संताप व्यक्त

मुंबई –  रवी किशन यांनी लोकसभेत इंडस्ट्रीतील ड्रग्स सेवनाचा मुद्दा उपस्थित केला होता आणि त्याविषयी चौकशीची मागणी केली होती. बॉलिवूड इंडस्ट्रीला आणि त्यातील कलाकारांना  सोशल मीडियावर घराणेशाही वरून चांगलाच टीकेचा सामना करावा लागतो आहे.  यावरूनच “ज्या ताटात खातात, त्याच ताटात नंतर छेद करतात”, अशा शब्दांत जया बच्चन यांनी टीका केली आहे.

खासदार जया बच्चन यांनी संताप व्यक्त केला आहे.  राज्यसभेत जया बच्चन म्हणाल्या, “मनोरंजन विश्वातील लोकांना सोशल मीडियावर वाटेल ते बोललं जातंय. ज्यांनी इंडस्ट्रीत नावं कमावली, त्यांना गटार म्हटलं जातंय. माझा याला पूर्ण विरोध आहे.

दरम्यान, सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील ड्रग्सचाही मुद्दा समोर आला. ड्रग्स प्रकरणावरून इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांवर निशाणा साधला जात आहे. इंडस्ट्रीची प्रतिमा मलिन केली जात असल्याची भावना काही कलाकारांनी व्यक्त केली.

Leave A Reply

Your email address will not be published.