नवी दिल्ली – मोदी आडनावाबाबत केलेल्या विधानामुळे काँग्रेसचे नेते राहुल गांधी चांगलेच अडचणीत आले आहेत. मोदी आडनावाबाबत केलेल्या विधानामुळे राहुल यांना सुरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली. याला चोवीस तास पूर्ण होताहेत तोच राहुल गांधींचे संसद सदस्यत्व देखील रद्द करण्यात आले. यावरून आता राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसून येत आहे. अनेक राजकीय नेत्यांनी यावर आपल्या प्रतिक्रया देखील दिल्यात आहेत.
अश्यातच, आता या प्रकरणावर अभिनेत्री स्वरा भास्कर हिने मोठी प्रतिक्रिया दिलीये. एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेचे ट्विट रिशेअर करत स्वरा भास्कर हिने मोठी पोस्ट लिहिलीये. आता स्वरा भास्कर हिची हिच पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे. या पोस्टच्या माध्यमातून आपली भडास काढताना स्वरा भास्कर दिसत आहे.
That’s how scared they are of so-called ‘Pappu’ ! Blatant misuse of law to ensure that @RahulGandhi ‘s growing popularity, credibility & stature are curbed and clear strong-arm tactics for 2024 Lok Sabha that RG now cannot contest.. My guess is RG will come out of this taller ✊🏽 https://t.co/GEsLrgQuOC
— Swara Bhasker (@ReallySwara) March 24, 2023
स्वरा भास्कर आपल्या पोस्ट मध्ये म्हणते की, “त्यांना तथाकथित पप्पूची इतकी जास्त भीती वाटते. राहुल गांधी यांची वाढती लोकप्रियता आणि विश्वासार्हता रोखण्यासाठी या कायद्याचा दुरुपयोग करण्यात आलायं. राहुल गांधी 2024 साली होणारी लोकसभा निवडणूक लढवू नयेत, त्यासाठी हे सर्व केले जात आहे. पण यामुळे राहुल गांधींची लोकप्रियता आणखी वाढेल, असा मला विश्वास वाटतो.’ असं ती म्हणाली आहे.
राहुल गांधींना शिक्षा झालेलं प्रकरण नेमकं काय ?
राहुल गांधी एका सभेत म्हणाले होते, “सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे आहे?” त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपचे आमदार आणि गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी तक्रार दाखल केली. तक्रारकर्त्याने दावा केला की राहुल गांधी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकातील कोलार येथे एका रॅलीत वादग्रस्त वक्तव्य केले होते, ज्यामुळे संपूर्ण मोदी समुदायाची बदनामी होते आहे.