स्मार्टफोन वापरणाऱ्यांसाठी ‘या’ वेबसाइट आहेत खूप उपयुक्त ! माहिती करून घ्या आणि राहा सुरक्षित !

नवी दिल्ली : सध्या स्मार्टफोन वापरात नाहीत, असे लोक शोधूनही सापडणार नाहीत. लहान मुले आणि वृद्ध तसेच ज्यांच्याकडे स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी पैसेही नाहीत, असे लोक वगळता सर्वचजण सर्रास स्मार्टफोन बाळगतात.

वास्तविक, स्मार्टफोन ही आजची सर्वात मोठी गरज बनली आहे, कारण त्याद्वारे बरेच काम सहजतेने ऑनलाईन होते. या फोनमुळे लोकांना बँकेत जाण्याची गरजही नाही, जर मोबाईल हातात असेल तर समजा संपूर्ण बँक तुमच्या हातात आहे. तुम्हाला कोणाकडेही पैसे पाठवायचे असतील किंवा कुठूनही पैसे मागायचे असतील, जर तुमच्या हातात स्मार्टफोन असेल तर सर्व काही शक्य आहे.

बऱ्याचदा लोक मोबाईलवर वेबसाईट इत्यादींसह अनेक गोष्टी शोधतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही वेबसाइट्सबद्दल सांगणार आहोत, ज्याबद्दल तुम्हाला क्वचितच माहिती असेल. जर तुमच्याकडे स्मार्टफोन असेल तर तुम्हाला या संकेतस्थळांबद्दल माहिती असणे आवश्यक आहे, कारण त्या तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरू शकतात.

* असे बरेच लोक आहेत जे वेबसाइटवर लॉगिन करण्यासाठी कोणता आयडी आणि पासवर्ड ठेवावा याबद्दल विचार करण्यास बराच वेळ घेतात. अशा वेळी ‘बग मी नॉट’ (BugMeNot) ही वेबसाइट आपली समस्या सोडवू शकते. ही वेबसाइट तुम्हाला एक आयडी आणि पासवर्ड देते, ज्याच्या मदतीने तुम्ही कोणत्याही वेबसाइटवर लॉग इन करू शकता. तुम्हाला फक्त ज्या वेबसाईटवर लॉग इन करायचे आहे त्याचे नाव एंटर करणे आवश्यक आहे आणि तुम्हाला सूचना म्हणून एक आयडी आणि पासवर्ड मिळेल.

* तुमचा पासवर्ड किती सुरक्षित आहे आणि हॅकर्सला तो क्रॅक होण्यास किती वेळ लागू शकतो हे जाणून घेण्यासाठी ‘हाऊ सिक्युअर माय पासवर्ड’ (howsecureismypassword.net) नावाच्या वेबसाइटला भेट देऊ शकता. ही वेबसाईट उघडल्यानंतर तुम्हाला सर्च बॉक्समध्ये पासवर्ड टाकावा लागेल आणि ही वेबसाइट तुमचा पासवर्ड किती सुरक्षित आहे हे सांगेल. जर तुम्हाला खात्री नसेल तर ते तपासा.

* वेबसाइट सुरक्षित आहे की नाही हे जाणून घेणे थोडे अवघड आहे, परंतु आपण ते सोपे करू शकता. ‘सेफ वेब’ (safeweb)नावाची वेबसाईट वापरून तुम्हाला माहिती होऊ शकते की कोणती वेबसाइट सुरक्षित आहे आणि कोणती नाही. तुम्हाला फक्त या वेबसाईटच्या सर्च बॉक्सवर जायचे आहे आणि तुम्हाला ज्या वेबसाईटबद्दल जाणून घ्यायचे आहे त्याची URL पेस्ट किंवा टाईप करा आणि सर्व काही कळेल. विशेष गोष्ट म्हणजे या वेबसाईटला अँटी व्हायरस नॉर्टनची साथ मिळाली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.