मुंबई : महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज होत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा विधानभवनात पार पडला. या मंत्रिमंडळात तीन महिला नेत्यांना संधी देण्यात आली आहे.
मंत्रिमंडळात वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर आणि आदिती तटकरे या तीन महिलांचा समावेश करण्यात आला असून आज त्यांचा शपथविधी पार पडला आहे. कॉंग्रेसकडून वर्षा गायकवाड आणि यशोमती ठाकूर यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले आहे. तर राष्ट्रवादीच्या आमदार आदिती तटकरे राज्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. आदिती तटकरे या सुनील तटकरे यांच्या कन्या आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून त्या पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आल्या आहेत.