मुंबई : आपले स्वतःचे एक हक्काचे घर असावे असे प्रत्येकाला वाटत असते. मात्र प्रत्येकाचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. मात्र आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आपले घर घेण्यासाठी दिवाळीनिमित्त काही बँकाकडून सर्वात स्वस्त होम लोन दिले जात आहे. आज आपण अशाच काही बँकांची माहिती घेणार आहोत.
1) बँक ऑफ बडोदा
बँक ऑफ बडोदाकडून ग्राहकांना 8.40 टक्के व्याज दरानं होम लोन उपलब्ध करून दिलं जात आहे. ते देखील झिरो प्रोसेसिंग फी सोबत. तसेच कार लोन 8.95 टक्के व्याज दरानं दिलं जात आहे. पर्सन लोन 10.80 टक्के व्याज दराने दिले जात आहे.
2) बँक ऑफ महाराष्ट्र
बँक ऑफ महाराष्ट्रकडून होम लोन 8.35 टक्के व्याज दरानं आणि ते देखील कोणतीही प्रोसेसिंग फी न आकारता उपलब्ध करून दिलं जात आहे. बँक ऑफ महाराष्ट्र कार लोन 8.70 टक्के व्याज दरानं देत आहे.
3) स्टेट बँक ऑफ इंडिया
स्टेट बँक ऑफ इंडिया देखील होम लोन अतिशय कमी दरामध्ये सध्या ग्राहकांना उपलब्ध करून देत आहे, तसेच कार लोनवर देखील कोणतेही प्रोसेसिंग फी सध्या बँकेकडून आकारली जात नाहीये, तसेच एफडीवर देखील आकर्षक व्याज दर दिला जात आहे.