‘या’ आहेत जगातील सर्वात कमी वयाच्या पंतप्रधान

नवी दिल्ली : फिनलॅंडच्या परिवहन मंत्री आणि सोशल डेमोक्रॅटिक पार्टीच्या नेत्या सना मरीन यांना जगातील सर्वात कमी वयाच्या पंतप्रधान होण्याचा बहुमान मिळाला आहे. वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी त्यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. दरम्यान, सना यांच्यावर जगभरातून शुभेच्छांचा व कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सना यांच्याच पक्षाचे पंतप्रधान एंटी रिने यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षाने पंतप्रधान पदासाठी सना यांची निवड केली. फिनलॅंडमध्ये महिनाभरापासून पोस्टाचा संप सुरू आहे. या संपावर तोडगा काढण्यास अपयशी ठरेलल्या एंटी रिने यांचा सहयोगी पक्षाने पाठिंबा काढून घेतल्याने अखेर पदाचा राजीनामा द्यावा लागला.

सना मरीन यांनी टॅम्पर विद्यापीठातून प्रशासकीय विज्ञानमध्ये मास्टर ही पदवी मिळवली आहे. वयाच्या 27 व्या वर्षी त्या टॅम्पर नगरपरिषदेच्या महापौरपदी निवडून आल्या. यंदा जून महिन्यात त्यांची फिनलॅंडच्या परिवहन आणि संचारमंत्रीपदी वर्णी लागली.

युक्रेनचे पंतप्रधान ओलेक्‍सी होन्चारूक (35) हे सर्वात तरुण पंतप्रधानांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना मरीन यांनी सांगितले, ‘कमी वयात पंतप्रधानपदापर्यंतचा पल्ला गाठेन असा मी कधीही विचार केला नव्हता. वयाच्या 27 व्या वर्षी मी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. माझे लहानपण खूप कष्टात गेले. आर्थिक चणचण असतानाही त्यांनी हायस्कूलपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. सना यांचे पालनपोषण त्यांच्या आईनेच केले आहे. सना यांचे लग्न झालेले असून त्यांना एक छोटी मुलगी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.