नवी दिल्ली – आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात संवादाच्या अनेक साधनांचा वापर माणसाकडून केला जातोय, मोबाईल फोन हे त्यापैकीच एक… आज हे साधन प्रत्येकाची गरज बनलं आहे. दरम्यान, तुम्ही सुद्धा नवीन मोबाइल घेण्याच्या विचारात असाल तर खालील बातमी नक्की वाचा…
नुकतंच हॉनर कंपनीने आपले नवीन दमदार मिड बजेट रेंजचा HONOR 9A आणि HONOR 9S हे दोन स्मार्टफोन लाँच करत आहे. हे दोन्ही फोन भारतीय कंपनीचे सर्वात स्वस्त फोन असून, सर्वसामान्यांना परवडणारे आहे.
कंपनीने HONOR 9A ची विक्री करण्यासाठी अॅमेझॉन इंडिया आणि HONOR 9S च्या विक्रीसाठी फ्लिपकार्टसोबत पार्टनरशीप केली आहे. या दोन्ही फोनमध्ये गुगल प्ले स्टोरच्या जागी ऑनर AppGallery मिळेल.
HONOR 9A ची खास वैशिष्ट्ये –
Honor 9A या फोन मध्ये 6.3 इंचाचा डिस्प्ले असून, रेजॉलूशन 720×1600 पिक्सल ऑक्टाकोर मीडियाटेक हीलियो P22 प्रोसेसर आहे. 3 जीबीचा रॅम आणि 64 जीबीचे स्टोरेज आहे.
तसेच फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा, सेटअप 13MP + 5MP + 2MP असून सेल्फीसाठी यात 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.
Honor 9S ची खास वैशिष्ट्ये –
5.45 इंचाचा डिस्प्ले, रिझॉल्यूशन 720×1440 पिक्सल, ऑक्टाकोर मीडियाटेक हीलियो P22 प्रोसेसर आणि 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज. आणि फोटोग्राफीसाठी सिंगल रियर कॅमेरा 8 मेगापिक्सल, 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Honor 9S ची बॅटरी 3020mAh इतकी आहे.