नवी दिल्ली : भाजपने बुधवारी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. या स्टार प्रचरकाच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, बॉलिवूडचे स्टार अभिनेते सनी देओल यांचा समावेश आहे.
भाजपच्या 40 स्टार प्रचारकांच्या यादीत मोदींव्यतिरिक्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी) सरचिटणीस बी.सी. एल. संतोष यांचा समावेश आहे. स्टार प्रचारकांमध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणी दिल्ली भाजप अध्यक्ष मनोज तिवारी भोजपुरी अभिनेते रवी किशन यांचाही समावेश आहे.
तसेच पंजाबमधील गुरदासपूर येथील भाजपा खासदार सनी देओल आणि मथुराच्या भाजपा खासदार हेमा मालिनी यांनाही भाजपने स्टार प्रचरकाच्या यादीत स्थान दिले आहे.
भाजपचे नवे अध्यक्ष जे.पी. नड्डा, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री रमेश पोखरियाल यांच्याकडे प्रचाराची संपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान, दिल्लीचे भाजपचे सात खासदार त्यांच्या लोकसभा मतदार संघांतर्गत येणाऱ्या मतदारसंघात प्रचार करतील.