नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात अनेक घोषणा करण्यात आल्या. या बजेटवर आता राष्ट्रीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्या काय आहेत जाणून घेऊयात…
“कुर्सी बचाओ बजेट. मित्रपक्षांना खुश करा, इतर राज्यांना पोकळ आश्वासने. सामान्य भारतीयांना कोणत्याही दिलासाशिवाय मित्रपक्षांचे फायदे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यामधून आणि मागील बजेटमधून कॉपी आणि पेस्ट केलेले या वर्षाचे बजेट आहे.
राहुल गांधी (काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी)मोदी सरकारने तरुणांसाठी काँग्रेसची योजना कॉपी-पेस्ट करून नाव बदलले. संपूर्ण देश महागाईने होरपळत आहे, मात्र अर्थसंकल्पात महागाईविरोधात पावले उचलल्याचे ऐकिवात नाही. या अर्थसंकल्पात काही लोकांना आपली पदे वाचवण्यासाठी खूश केले आहे, असे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले.
मल्लिकार्जुन खरगे (काँग्रेस अध्यक्ष)भारतातील बेरोजगारीच्या दरावर मोदी 3.0 सरकारचा प्रतिसाद खूपच कमी आहे. अर्थसंकल्पीय वाटपाचा बेरोजगारीच्या गंभीर परिस्थितीवर फक्त थोडासा परिणाम होईल. जाहीर केलेल्या योजनांमुळे 290 लाख लोकांना फायदा होईल हा दावा अतिशयोक्तीपूर्ण आहे.
पी. चिदंबरम (काँग्रेस नेते)अयशस्वी सरकारच्या अयशस्वी अर्थमंत्र्यांनी सादर केलेला हा अर्थसंकल्प शून्य वॉरंटीसह पूर्णपणे अपयशी ठरला आहे. बेरोजगारी, वाढत्या किमती आणि वाढती महागाई यासारख्या तातडीच्या समस्यांना सामोरे जाण्याऐवजी, भाजपने आपल्या युती भागीदारांना लाच देण्यासाठी आणि वेळ विकत घेण्यासाठी बजेट तयार केले आहे.
ममता बॅनर्जी ( मुख्यमंत्री, पश्चिम बंगाल)केंद्रीय अर्थसंकल्पात उत्तर प्रदेशकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे. सरकार वाचवण्यासाठी बिहार आणि आंध्र प्रदेश या दोन्ही राज्यांना विशेष योजनांचा लाभ देण्यात आला आहे. बिहार आणि आंध्र प्रदेशला विशेष योजनांशी जोडले गेले आहे हे चांगले आहे, पण यूपीसारख्या राज्याच्या शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात काहीच नाही. जर आपण उत्तर प्रदेशकडे पाहिले तर गुंतवणुकीची स्थिती काय आहे? त्यांचे सुरू असलेले प्रकल्प कधीच वेळेवर पूर्ण झाले नाहीत.
अखिलेश यादव (अध्यक्ष, समाजवादी पार्टी)