‘हे’ आहेत आयपीएलच्या ‘आठ’ संघांचे मालक; जाणून घ्या त्यांच्याबद्दल सर्वकाही…

मुंबई – आयपीएल या स्पर्धेचा यंदा चौदावा हंगाम पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी अत्यंत आवश्यक असणाऱ्या खेळाडूंचा लिलाव आज (दि. १८) चेन्नई येथे होणार आहे. आज होणाऱ्या या मिनी लिलावासाठी तब्ब्ल २९२ खेळाडूंची नावे निश्चित करण्यात आली आहेत.

यामध्ये १६४ भारतीय खेळाडू आणि १२५ विदेशी खेळाडू त्याचबरोबर ३ असोसिएट देशांच्या खेळाडूंचा सहभाग असणार आहे. या स्पर्धेत एकूण आठ संघ सहभागी आहेत. या संघांची मालकी विविध बॉलिवूड स्टार आणि बिजनेसमॅन यांच्याकडे आहे. त्यामुळे आज आपण या आठ आयपीएल संघांचे मालक कोण आहेत?  हे जाणून घेऊया…

१) राजस्थान रॉयल्स :
राजस्थान रॉयल्स या संघाने आतापर्यंत आयपीएल स्पर्धेत एकदाच विजेतेपद पटकावले आहे. या संघाने २००८ साली आयपीएल स्पर्धेचा पहिला हंगाम जिंकला होता. यंदा होणाऱ्या हंगामासाठी या संघाचे नेतृत्व संजू सॅमसनकडे देण्यात आले आहे. त्याचबरोबर या संघाची मालकी मनोज बडाले आणि लचलन मुर्दोच यांच्याकडे आहे.

२) दिल्ली कॅपिटल्स :
दिल्ली कॅपिटल्स संघाने अजून एकदाही आयपीएल स्पर्धेत विजेतेपद पटकावले नाही. मागील हंगामात हा संघ अंतिम सामन्यात पोहचला होता. मात्र या ठिकाणी या संघाला पराभव स्वीकारावा लागला. या संघाचे नेतृत्व श्रेयश अय्यरकडे आहे. या संघाची मालकी जीएमआर आणि जेएसडब्ल्यू ग्रूप यांच्याकडे आहे.

३) मुंबई इंडियन्स :
मुंबई इंडियन्स या संघाने आतापर्यंत झालेल्या १३ हंगामात ५ वेळा विजेतेपद पटकावले आहे. हा संघ आतापर्यंतच्या आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आहे. या संघाची मालकीन नीता अंबानी या आहेत . तसेच या संघाची अधिकृतरित्या  मालकी रिलायंस इंडस्ट्रीजकडे आहे.

४) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर :
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने अजून एकदाही विजेतेपद मिळवले नसून, विराट कोहली या संघाचा कर्णधार आहे. त्याचबरोबर विराट कोहली या संघाचे पहिल्या हंगामापासून आतापर्यंत प्रतिनिधित्व करत आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाची मालकी महेंद्र कुमार शर्मा यांच्याकडे आहे.

५) चेन्नई सुपर किंग्स :
चेन्नई सुपर किंग्स संघाने आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत ११ हंगामात भाग घेत तीनवेळा विजेतेपद पचकावले आहे. त्याचबरोबर या संघावर स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दोन वर्षे बंदी घालण्यात आली होती. या संघाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाचे मालकी इंडिया सिमेंट लिमिटेडकडे आहे आणि याचे मालक हे माजी बीसीसीआय अध्यक्ष एन. श्रीनिवासन आहेत.

६) किंग्स इलेव्हन पंजाब : 
किंग्स इलेव्हन पंजाब हा संघ गेल्या १३ वर्षांपासून या स्पर्धेत सहभागी होत आहे. परंतु या संघाला एकदाही आयपीएलचा किताब जिंकता आलेला नाही. या संघाचे नेतृत्व केएल राहुलकडे आहे. तसेेच या संघाची मालकी चार व्यक्तींकडे आहे. यामध्ये सुरेंद्र पॉल, अभिनेत्री प्रीती झिंटा, नेस वाडिया आणि मोहित बर्मन यांचा समावेश आहे.

७) कोलकाता नाईट रायडर्स :
कोलकाता नाईट रायडर्स संघाने आतापर्यंत १३ हंगामात भाग घेतला असून, यापैकी दोन हंगामात या संघाने विजेतेपद मिळवले आहे. या संघाचा कर्णधार इयान मॉर्गन आहे. त्याचबरोबर संघाचा मालक बॉलिवूडचा बादशहा म्हणजेच अभिनेता शाहरुख खान आहे. तसेच सहमालक अभिनेत्री जूही चावला आणि तिचा पती अजय मेहता हे आहेत.

८) सनरायजर्स हैद्राबाद :
सनरायजर्स हैद्राबाद संघाने आयपीएल स्पर्धेत २०१६ साली एकमात्र विजेतेपद मिळवले आहे. मात्र या संघाला मागील चार वर्षात एकदाही विजेतेपद पटकावता आलेले नाही. या संघाचे नेतृत्व डेविड वॉर्नरकडे आहे. तसेच संघाची मालकी कलानिथी मारन यांच्याकडे आहे. त्याचबरोबर ते सन टी.व्ही. नेटवर्कचे मालक आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.