‘हे’ आहेत बहुगुणी हळदीचे लाभदायक फायदे

पुणे – हळद एक आयुर्वेदिक औषध ही मसाल्यांच्या पदार्थांमधील एक प्रमुख घटक आहे. कारण हळदीशिवाय अनेक भारतीय पदार्थ तयारच होऊ शकत नाहीत. एवढंच नाही तर भारतीय आयुर्वेद शास्त्रातदेखील हळदीला अगदी महत्त्वाचं स्थान आहे. त्यामुळे कोणतीही लहान मोठी जखम असो हळदीमुळे ती जखम लवकर बरी होते. असेच काही हळदीचे गुणकारी फायदे तुम्हाला सांगणार आहोत…

  • हळदीचे दूध प्यायल्याने त्वचेत एक चमक निर्माण होते. दुधासोबत हळदी सेवन केल्याने त्वचेच्या विकारांपासूनही बचाव होतो.
  • हळदीमध्ये करक्युमिन नावाचं रसायनं औषध म्हणून काम करते. यामुळे शरीरातील सूज कमी होण्यास मदत होते.
  • तसेच आपल्या शरीराच्या जखमेवर हळद अँटीबॅक्टेरिअल म्हणून काम करते.
  • हळदीच्या पाण्याचे सेवन केल्याने पचनक्रिया सुरळीत होते. तसेच हळदीच्या पाण्यामुळे हृदयाचे आरोग्य राखण्यास उत्तम मदत होते.

 

  • सर्दी किंवा कफ यांवर हळदयुक्त दूध उपयुक्त ठरते.
  • हळदीच्या सेवनाने थंडी, फ्लू इ. सारख्या इंफेक्शनपासून संरक्षण होते.
  • पचनक्रिया बिघडली असल्यास कच्ची हळद फायदेशीर ठरते. कारण कच्ची हळद पचनक्रिया सुरळीत करते.
  • तसेच, हळदीमधील करक्युमिन हे रसायन शरीरीच्या सुक्ष्मातीसुक्ष्म पेशी-घटकांवर काम करते व कॅन्सरसारख्या महाभयंकर रोगापासून संरक्षण करते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.