‘राजकुमारी रिमा बिंत बंदार’ सौदी अरबच्या अमेरिकेतील पहिल्या महिला राजदूत

रियाद (सौदी अरब): सौदी अरबच्या राजकुमारी रिमा बिंत बंदार यांची सौदीची अमेरिकेतील राजदून म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. शनिवारी एका शाही आदेशात हे जाहीर करण्यात आले आहे. सौदी अरबचे अमेरिकेतील राजदूत राजकुमार खालिद बिन सलमान यांची त्या जागा घेतील. राजकुमारी रिमा बिंत बंदार या सौदी अरबच्या पहिल्याच महिला राजदूत आहेत. राजकुमार खालिद बिन सलमान यांची सौदीच्या उप संरक्षण मंत्रिपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांचे वडील बंधू युवराज मोहंमद बिन सलमान हे सौदी अरबचे संरक्षण मंत्री आहेत. 3

वॉशिग्टन विद्यापीठाच्या पदवीधर असलेल्या राजकुमारी रिमा बिंत बंदार यांचे वडील पूर्वी अमेरिकेतील सौदीचे राजदूत असल्याने राजकुमारी रिमा अमेरिकेत दीर्घकाळ राहिलेल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.