हे रावणाचे वंशज आहेत; काँग्रेस नेत्याचे भाजपवर टीकास्त्र

नवी दिल्ली : भाजपचे नेते अनंतकुमार हेगडे यांनी महात्मा गांधी यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्य भाजपला चांगलेच महागात पडले आहे. यामुळे भाजपला घेरण्याची आयतीच संधी विरोधकांना मिळाली आहे. याचे पडसाद संसदेतही उमटले असून हे रावणाचे वंशज आहेत, अशी टीका काँग्रेसच्या नेत्याने भाजपवर केली आहे.

हेगडे यांच्या वक्तव्याचा निषेध करत काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले कि, आज हे महात्मा गांधींविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करत आहेत. हे रावणाचे वंशज आहे. श्रीरामाच्या पुजारीचा अपमान करत आहेत, अशा शब्दात त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. एवढ्यावरच न थांबता अधीर रंजन चौधरी यांनी नथुराम गोडसे यांचाही उल्लेख केला. हे सरकार गोडसेंचे सरकार असल्याची टीका त्यांनी केली. अधीर रंजन चौधरी यांच्या या वक्तव्यावर भाजप खासदारांनी आक्षेप घेतला.

दरम्यान, थेट महात्मा गांधी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणे अनंतकुमार हेगडे यांना महागात पडण्याची शक्‍यता आहे. त्या वक्तव्यामुळे हेगडे यांच्यावर पक्षाचे केंद्रीय नेतृत्व नाराज झाले आहे. कारणे दाखवा नोटीस बजावून हेगडे यांच्याकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. वादग्रस्त वक्तव्याबद्दल हेगडे यांना माफी मागण्याचा आदेश दिला जाऊ शकतो.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.