पिंपरी – थेरगाव क्वीनचे ४१ हजार फॉलोअर्स असून ते अधिक वाढवण्याच्या प्रयत्नात अश्लील भाषा, धमकीचे रील बनवत होती. परंतु, हीच अश्लील भाषा, धमकीचे रीलमुळे थेरगाव क्वीनला पोलिसांनी खाकी इंगा दाखवला.
View this post on Instagram
मात्र असे असले तरी सुद्धा थेरगाव क्वीनमध्ये सुधारणा झालेली दिसली नाही. पिंपरी चिंचवड इथे थेरगाव क्वीन या इन्स्टाग्राम अकाउंटवरील व्हिडिओ मुळे चर्चेत आलेल्या साक्षी श्रीमल हिची थेरं कमी होताना दिसत नाहीत.
View this post on Instagram
पोलीस ठाण्यातून सुटका झाल्यानंतर तिचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. पोलिसांनी अटक कलेला व्हिडीओ टाकत त्याला भाई गिरीच गाणं ही जोडण्यात आलं आहे.
तत्पूर्वी, माझ्या व्हिडीओमुळे कोणाचं मन दुखावलं गेलं असेल तर मी माफी मागते मला क्षमा करावा असं तिने म्हटले होते. मात्र आता पुन्हा एकदा तिने अश्लील भाषा, धमकीचे रील बनवले आहे. थेरगाव क्विन या अकाऊंटबद्दल अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. ज्यानंतर आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या आदेशावरुन ही कारवाई करण्यात होती.