पुणे – भाजप आणि मनसे यांच्या युतीच्या चर्चा गेल्या काही दिवसापासून राज्यातील राजकीय वर्तुळात बघालया मिळत आहेत. मात्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी युती होण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. आज चंद्रकांत पाटील मनसेचे अध्यक्ष अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. या भेटी आधिच त्यांनी हे व्यक्तव्य केले आहे.
There's no possibility of BJP-MNS alliance because the latter's views about other states are unacceptable to us. Despite difference of opinion, it's important to meet each other so I will meet him (MNS chief Raj Thackeray) tomorrow: Maharashtra BJP chief Chandrakant Patil (05.08) pic.twitter.com/SqR07UI468
— ANI (@ANI) August 5, 2021
मनसेचे इतर राज्यांबद्दलचे विचार आम्हाला मान्य नाहीत. त्यामुळे भाजप-मनसेमध्ये युती होण्याची शक्यता नाही आहे. मात्र मतभेद असले तरी एकमेकांच्या भेटीगाठी घेणे महत्वाचे असते म्हणून मी उद्या राज ठाकरेंची भेट घेणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.
दरम्यान या भेटीत भाजप-मनसे युतीसंदर्भात चर्चा होणार असल्याचे संकेत चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. ही सदिच्छा भेट असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले आहे.