… म्हणून नाकारली 2 कोटींची जाहिरात

सिनेसृष्टीतल्या कलाकारांना जाहिरात क्षेत्रामध्ये असलेली डिमांड लक्षात घेऊन वाट्टेल त्या प्रॉडक्‍टसाठी त्यांना ऍम्बेसेडर केले जाते. काही दिवसांपूर्वी पान मसाल्याची जाहिरात करण्यावरून अजय देवगण आणि त्यापूर्वी अनुष्का शर्माला ट्रोल केले गेले होते. तर हार्ट ऍटॅक येऊन गेल्यानंतरही वेफर्सची ऍड केल्याबद्दल सैफ अली खानलाही ट्रोल केले गेले होते. हानीकारक वस्तूंची जाहिरात करण्यावरून ट्रोल होणे ही वेगळी गोष्ट पण फेअरनेस क्रीमची ऍड करण्याला कोणाची काही आडकाठी असण्याचे कारण नसावे. पण तरिही दक्षिणेतल्या साई पल्लवी नावाच्या ऍक्‍ट्रेसने फेअरनेस क्रीमची जाहिरात करण्यास नकार दिला आहे. तिला या जाहिरातीसाठी तब्बल 2 कोटी रुपयांचे पॅकेज मिळणार होते. पण तरिही तिने या जाहिरातीला नकार दिला. त्यामागचे कारणही तिने स्पष्ट केले आहे.

2005 सालच्या “प्रेमम’ सिनेमामुळे प्रकाशझोतात आलेल्या साईला जेंव्हा ही जाहिरात करण्याबाबत विचारले गेले, तेंव्हा आपल्या सावळ्या रंगाबाबत आपल्याला अभिमान असल्याचे तिने सांगितले. हा सावळा रंगच भारतीयांचा अस्सल रंग आहे. युरोपिय लोक एवढे गोरे किंवा पांढरे का असतात, असे विचारायला आम्ही भारतीय जातच नाही. काही क्रीम वगैरे लावून आम्हा भारतीयांनाही त्यांच्यासारखे गोरे व्हावे, असेही वाटणार नाही. त्यांच्या त्वचेचा रंग “त्यांचा’ आहे. आमच्या त्वचेचा रंग “आमचा’ आहे. तो राहणीमानामुळे आहे. आफ्रिकेतल्या लोकांच्या त्वचेचा रंगही त्यांना शोभेल असाच आहे. ते लोकही सुंदऱ आहेत, असे उत्तर देऊन साईने फेअरनेस क्रीमच्या कंपनीला निरुत्तर केले आहे.

2 कोटी रुपये घेऊन मी काय करू? मी घरी 3 चपात्या खाते. कारमधून बाहेर जाते. मला एवढ्या पैशांची गरजच काय. मला चेहऱ्यावरच्या गोरेपणापेक्षा इतरांच्या आनंदात सहभागी व्हायला जास्त आवडेल, असे ती म्हणाली.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×