कोणता अन् कोणाचा निकाल लागणार आधी? : सकाळी आठला सुरू होणार मतमोजणी
नगर – जिल्ह्यातील बारा विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी(दि.21) 69.43 टक्के मतदान झाल्यानंतर आता मतमोजणी अर्थात निकालाची उत्सुकता सर्वांना लागून आहे. उद्या गुरुवारी, दि.24 मतमोजणी होत असून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या निकालांकडे लागून आहे. बारा मतदारसंघातले बारा बाजीगार(आमदार) ठरणार आहेत. या बारा लढतीतील काही चुरशीने तर काही एकतर्फीच होणार आहेत.
बारा मतदारसंघांची मतमोजणी त्या-त्या तालुक्याच्या ठिकाणी सकाळी 8 वाजता सुरु होणार आहे. सुरूवातीला पोस्टल व सैनिकी मते मोजली जातील. त्यानंतर ईव्हीएम मशिनच्या मतमोजणीस प्रारंभ होईल. एका मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी 14 टेबल आहेत. म्हणजेच एकावेळी 14 मतदानकेंद्राची मतमोजणी होईल. त्या मतदारसंघातील मतदानकेंद्राच्या संख्येवर तेथील फेऱ्या होतील. समजा अकोले मतदारसंघात 397 मतदान केंद्रे आहेत.
एकावेळी 14 याप्रमाणे येथे 22 मतमोजणीच्या फेऱ्या होतील. सर्वात जास्त म्हणजे 27 फेऱ्या पारनेर विधानसभा मतदारसंघात होतील. येथे एकूण 365 मतदानकेंद्रे आहेत. त्याखालोखाल शेवगाव-पाथर्डीत 361 मतदानकेंद्रे असून येथेही त्यामुळे सर्वात उशिरा पारेनर मतदारसंघाचा निकाल हाती येण्याची शक्यता आहे. शेवगाव-पाथर्डी व कर्जत-जामखेडच्या निकालांनाही उशीर लागण्याची शक्यता आहे.तर, संगमनेर मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे 278 मतदान केंद्र आहेत. त्यामुळे येथे 20 फेऱ्या होतील. त्याखालोखाल नेवासा, कोपरगाव, शिर्डीचे निकाल लवकर लागतील अशी शक्यता वर्तविली जात आहे.
काही लढती चुरशीने तर काही एकतर्फीच
नगर जिल्ह्यातील बाराही विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक लढतीचा बाज अन ढंग वेगळा असला तरी काही लढती अत्यंत चुरस व अटीतटीने तर काही लढती एकतफर् ीच झाल्या आहेत. चुरशीच्या लढतीत पारनेर,कर्जत-जामखेड,अकोले,कोपरगाव,नेवासा येथे अधिक चुरस जाणवत आहे. त्यामुळे या लढतींकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. राहुरी,शेवगाव-पाथर्डी,नगर शहर,श्रीरामपूर येथेही चांगल्या लढती झालेल्या आहेत.तर शिर्डी व संगमनेरची लढत मात्र पूर्णपणे एकतफर् ीच झालेल्या आहेत.