पुणे – राज्यात नैर्ऋत्य मोसमी वारे सक्रिय होण्यासाठी पोषक हवामान तयार झाले आहे. त्यामुळे येत्या 24 तासांत मध्य महाराष्ट्र आणि कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
दक्षिण महाराष्ट्र ते उत्तर केरळ किनारपट्टीजवळ कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, राज्यात नैर्ऋत्य मोसमी वारे सक्रिय होण्यासाठी पोषक हवामान तयार झाले आहे. गेल्या 24 तासांत मुंबईसह कोकणात विविध ठिकाणी पावसाने जोर धरला आहे. कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्रात बुधवारी (दि.15) मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
तर मराठवाडा, विदर्भातही पावसाचा जोर वाढणार असून, काही ठिकाणी मेघगर्जना, वीजांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.