मुंबई – शिरुर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे खासदार म्हणून निवडून आलेले डॉ. अमोल कोल्हे यांनी पुन्हा एकदा मोठी घोषणा केली आहे. लवकरच आपल्या ‘जगदंब क्रिएशन्स’ या निर्मिती संस्थेअंतर्गत एकूण तीन शिवकालीन चित्रपट येणार असल्याचं कोल्हेंनी जाहीर केलं. आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून त्यांनी असं म्हंटल आहे.
‘शिवप्रताप’ नावाच्या चित्रपट शृंखले अंतर्गत वाघनखं, वचपा आणि गरुडझेप अशा तीन चित्रपटांची निर्मिती करण्यात येणार आहे. हे तिन्ही चित्रपट केवळ मराठीतच नव्हे, तर हिंदी भाषेतही प्रदर्शित करण्यात येणार आहेत.
दरम्यान, ‘शिवप्रताप वाघनखं’चा पहिला टिझर नुकतंच प्रदर्शित करण्यात असून, हा चित्रपट 6 नोव्हेंबर 2020 च्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्यात येणार आहे. असं अमोल कोल्हेंनी म्हंटलं आहे.