…तर संपूर्ण देशात गंभीर परिस्थिती उद्भवेल – मेहबुबा मुफ्ती

श्रीनगर – लोकसभा निवडणुकीआधी देशभरात राजकीय वातावरण चांगलेच तापत आहे. निवडणुकीच्या तीन दिवस आधी भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. भाजपच्या जाहीरनाम्यात जम्मू काश्मीर राज्याला असणारा विशेष राज्याचा दर्जा ३७० कलम आणि अनुच्छेद ३५ अ रद्द करण्याचे आश्वासन दिले आहे. यावर जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी च्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी आपली प्रतिक्रिया देत विरोध दर्शवला आहे.

भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यात जम्मू काश्मीर मधील विशेष राज्याचा दर्जा असणारे कलम ३७० आणि अनुच्छेद ३५ अ रद्द करण्यासंदर्भात असलेले आश्वासन हे, घातक असल्याचे मेहबुबा मुफ्ती यांनी सांगितले आहे. आधीपासूनच जम्मू-काश्मीर राज्य आगीत होरपळत आहे आणि त्यानंतर जर कलम ३७० आणि अनुच्छेद ३५ अ रद्द केल्यास  जम्मू-काश्मीर राज्यासोबतच संपूर्ण देश आगीच्या खाईत जाईल, असे मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला आवाहन करत मेहबुबा मुफ्ती यांनी आगीशी खेळू नये असे सांगितले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.