भविष्य निर्वाह निधीच्या सुविधेत होणार मोठा बदल

ड्रायव्हर, स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्तींनाही मिळणार लाभ

नवी दिल्ली : देशात भविष्य निर्वाह निधीच्या सुविधांमध्ये मोठे बदल घडणार आहेत. आजपर्यंत नोकरदारांनाच याचा फायदा मिळत होता परंतु, आता लवकरच ड्रायव्हर, नोकरचाकर अथवा स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्तींनाही भविष्य निर्वाह निधीचा लाभ मिळण्याची शक्‍यता आहे. सामाजिक सुरक्षेची व्याप्ती वाढवण्याच्या हेतूने वंचित घटकांना भविष्य निर्वाह निधीच्या (पीएफ) कक्षेत सामावून घेण्याची योजना केंद्र सरकारने आखली आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राने याविषयी माहिती दिली.

सध्या मासिक किमान 15 हजार रुपये पगार असणाऱ्या व्यक्तींनाच भविष्य निर्वाह निधीची (पीएफ) सुविधा मिळत असली तरी यात लवकरच बदल होण्याची शक्‍यता आहे. पीएफची योजना राबवण्यासाठी आस्थापनांच्या मालकांना सध्याच्या नियमानुसार किमान कर्मचारी असणे बंधनकारक आहे. तसेच, या योजनेचा लाभ घेण्यासाठी मासिक किमान 15 हजार रुपये पगार असणे आवश्‍यक आहे. परिणामी, 15 हजार रुपयांपेक्षा कमी पगार असणारे कर्मचारी/कामगार पीएफच्या सुविधेपासून वंचित राहतात. एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या माहितीनुसार, आतापर्यंत पीएफपासून वंचित राहणाऱ्यांनाही लाभ घेता यावा यासाठी लवकरच संबंधित कायद्यामध्ये आवश्‍यक बदल करण्यात येणार आहेत. यासाठी कामगार मंत्रालयाकडून कर्मचारी निर्वाह निधी कायद्यामध्ये आवश्‍यक बदल करण्यात येणार आहेत. कामगारांना अनेकदा एका ठिकाणचे काम सोडून दुसरीकडे जावे लागते. सेवाक्षेत्र व कंत्राटी पद्धतीमध्येही वाढ होत आहे. यामुळे पीएफसंबंधी कायद्यामध्ये आवश्‍यक बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे असं या मसुद्यात नमूद करण्यात आले आहे. परिणामी, सध्या मासिक किमान हजार रुपये पगार असणाऱ्या व्यक्तींनाच भविष्य निर्वाह निधीची (पीएफ) सुविधा मिळत असली तरी यात लवकरच बदल होण्याची शक्‍यता आहे. यामुळे चालक, नोकरचाकर, घरगडी, स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्ती आदींना पीएफचा लाभ मिळू शकेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)