नवी दिल्ली – भारतात 8 जानेवारी ते 30 जानेवारी या कालावधीत ब्रिटन हून येणाऱ्या सर्व प्रवाशांची कोविड चाचणी करण्याचा निर्णय आरोग्य मंत्रालयाने घेतला आहे. भारतात येण्यापुर्वी ज्या प्रवाशांनी ब्रिटन मध्ये 72 तासांच्या आत अशी चाचणी केली असेल तर त्यांना त्यातून वगळण्यात येईल.
पण ज्यांच्याकडे कोविड निगेटीव्ह सर्टिफिकेट आहे पण त्या सर्टिफिकेटला 72 तासांपेक्षा अधिक अवधी झाला आहे त्यांच्या भारतात पुन्हा चाचण्या घेतल्या जाणार आहेत. सध्या ब्रिटनहून येणाऱ्या विमानांना भारतात बंदी आहे. पण ही बंदी 7 जानेवारीपर्यंतच आहे.
8 जानेवारीनंतर ही विमान सेवा पुन्हा सुरू होणार आहे. त्यासाठी ही एसओपी निश्चीत करण्यात आली आहे. ब्रिटनमधून भारतासाठी प्रवासी घेतानाच या प्रवाशांकडे कोविड निगेटीव्ह सर्टिफिकेट आहे की नाही याची खात्री करून घ्यावी अशी सुचना विमान कंपन्यांना करण्यात आली आहे.