पीयुसीच्या दरात होणार वाढ

पुणे – पीयुसी दरात वाढ करण्याचा निर्णय ऑल पीयुसी सेंटर ओनर्स असोसिएशनने घेतला. मागील काही वर्षांपासून दरवाढ झाली नसून, दिवसेंदिवस केंद्रचालकांवरील आर्थिक भार वाढत आहे. त्यामुळे हा निर्णय घेतला. मात्र, परिवहन आयुक्‍त कार्यालयाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

एप्रिलपासून ऑनलाइन पीयुसी काढण्यात येत आहे. यामुळे केंद्रचालकांना इंटरनेटसह अद्ययावत उपकरणांची व्यवस्था करावी लागत आहे. त्यामुळे खर्चात वाढ झाली आहे.

असोसिएशनने निश्‍चित केलेले दर
दुचाकीसाठी 100 रुपये, तीन चाकी 150 रुपये, पेट्रोल चारचाकी 200 रुपये, डिझेल चारचाकी 300 रुपये आणि अवजड वाहनांसाठी 400 रुपये असा दर असोसिएशनने निश्‍चित केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.