शंभर रुपयांची स्मार्ट नोट येणार

नवी दिल्ली: रिझर्व्ह बॅंक आता 100 रुपयाची नोट सादर करण्याच्या तयारीत आहे. या नोटेत खास बदल करण्यात येणार आहेत. सध्याच्या नोटेपेक्षा नवीन नोट टिकाऊ असणार आहे. सध्याची नोट ही दोन ते तीन वर्षांपर्यंत टिकते परंतु नवीन येणारी नोट 7 वर्षांपर्यंत टिकेल सध्या तीचे प्रायोगिक तत्वावर सादरीकरण केले जाणार आहे. विशेष लेसर असलेल्या नोटा लवकर फाटत नसल्याची माहिती आरबीआयच्या वार्षिक अहवालात देण्यात आली आहे.

नवीन येणारी नोट पाण्यात भिजल्यास, केमिकल्समध्ये बुडाल्यास आता भीती नाही, कारण लाकडावर किंवा लोखंडावर लावण्यात येणाऱ्या वार्निशचा मुलामा या नोटेला लावण्यात येणार आहे. त्यामुळे या नोटेचे जीवन अजून वाढण्यास मदत होणार आहे. सध्या 100 रुपयाच्या 1 हजार नोटांची निर्मिती करण्यास 1570 रुपये खर्च येतो. त्यात 20 टक्‍क्‍यांनी अधिकचा खर्च येणार असल्याचे आरबीआयने म्हटले आहे.

जगभरातील अनेक देश वार्निशच्या नोटांचा वापर करत आहेत. त्यामुळे त्या देशातील नोटा अधिक काळ टिकतात त्यामुळे त्यांना फाटक्‍या व मळक्‍या नोटा बदलून द्याव्या लागत नसल्याचे पहावयास मिळत आहे. तसेच आपल्यालाही नोटा बदलून देणे व नवीन निर्मिती करणे या खर्चात कपात करणे शक्‍य होणार असल्याचा विश्वास आरबीआयने यावेळी व्यक्त केला आहे.


 दोन हजारांच्या नोटांची छपाई कमी…

नोटाबंदीच्या काळात निर्मिती केलेल्या दोन हजारांच्या नोटेचीछपाई रिझर्व्ह बॅंकेने कमी केलेली आहे. यावर्षी वापरात असलेल्या या नोटांची संख्या 329 कोटींवरुन 7.2 कोटींपर्यंत घसरण झाली आहे. आता आरबीआयने आपले लक्ष अन्य नोटांकडे वळवले आहे. मार्च 2017 मध्ये सर्व बंद करण्यात आलेल्या नोटा बदलल्यानंतर बाजारात एकूण पैशांच्या 50 टक्के किंमतीएवढया 2 हजारांच्या नोटा होत्या. वर्षभरात त्यांची संख्या 37 टक्के इतकी कमी झाली. सध्या तर हा आकडा 31 टक्क्‌यांवर आला आहे. म्हणजेच बाजारात 31 टक्के किंमतीच्या दोन हजारांच्या नोटा उपलब्ध आहेत. अन्य नोटा आता 500,200, आणि 100 रुपयांच्या नोटांचा मोठया प्रमाणात पुरवठा करण्यात येणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)