पुणे – यंदा पर्वती विधानसभा मतदार संघात तिसऱ्यांदा हॅट्ट्रिक होणार, असाचा विश्वास भाजप उमेदवार आणि आमदार माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केला आहे. मिसाळ यांच्या प्रचारार्थ संपूर्ण मतदारसंघात शनिवारी भर पावसात दुचाकीफेरी काढण्यात आली होती. मिसाळ यांना विक्रमी मताधिक्याने विजय मिळवून देण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
पुणे मेट्रोच्या तीन मार्गिकांचे गतिमान काम, स्वारगेट-कात्रजसह अन्य उपनगरांमध्ये विस्तारित मेट्रो मार्ग, सिंहगड रस्ता, सेव्हन लव्हज चौक, स्वारगेट चौकात उड्डाणपूल, दक्षिण पुण्यातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवा मिळाव्यात, यासाठी बिबवेवाडीत 500 खाटांचे रुग्णालय, पु. ल. देशपांडे उद्यानात कलाग्राम प्रकल्प, स्वारगेट चौकात ट्रान्सपोर्ट हब, सिंहगड रस्त्यावर कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलीस ठाणे, बिबवेवाडी पोलीस चौकी, गंगाधाम चौकात अग्निशमन केंद्र अशी विकासकामांची मोठी जंत्री असल्याने यंदा पर्वतीत सलग तिसऱ्यांदा हॅट्ट्रिक होईल, असे मिसाळ म्हणाल्या.
भाजपचे शहर सरचिटणीस दीपक मिसाळ, मतदारसंघाचे अध्यक्ष हरिश परदेशी, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, नगरसेवक कविता वैरागे, प्रवीण चोरबेले, राजश्री शिळीमकर, सरस्वती शेंडगे, अनिता कदम, आनंद रिठे, शंकर पवार, प्रसन्न जगताप, श्रीकांत जगताप, मंजुषा नागपुरे, ज्योती गोसावी, साईदिशा माने, महेश वाबळे, मानसी देशपांडे, राजा शिळीमकर, अनुसया चव्हाण, बाळा ओसवाल, वर्षा साठे, रुपाली धाडवे, रघुनाथ गौडा, गोपाळ चिंतल, संतोष कदम, राजाभाऊ शेंडगे, राहुल माने, विश्वास ननावरे, विशाल पवार, जितेंद्र पोळेकर, प्रशांत दिवेकर, शेखर वाघ, बाबुराव घाटगे, सूरज लोखंडे, जीवन माने, अमोल रासकर, किरण वैष्णव, अजय डहाळे, योगेश वाबळे, मंगेश शहाणे, मंदार रांजेकर, राजू कदम, प्रीतम नागापुरे, संजय गावडे, अजय भोकरे, प्रतीक देसरडा, कुणाल चौगुले, ज्ञानेश्वर मानकर, राहुल मेहता, गणेश शेरला, नितीन बेलदरे, शशिकांत काळे, सुजित सामदेकर, परेश जोशी, शैलेश देशपांडे, विनया बहुलीकर, प्रवीण दिवेकर, सचिन वांगणे, निलेश हादगे, करण मिसाळ, त्रिश मिसाळ, शिवम देशपांडे, ओम गुप्ते आदी उपस्थित होते.