कोठडीतील मृत्यू प्रकरणांची दंडाधिकारीय चौकशी होणार

प्रातांधिकारी गाडेकर करणार चौकशी
नगरसेवक गिरवले यांच्यासह तिघांचा मृत्यू 

नगर  – विविध गुन्ह्यामध्ये अटक केलेली व न्यायालयीन कोठडी मिळालेल्या आरोपींचा कोठडीतच मृत्यू झाला आहे. अशा व्यक्तींची नगर उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्या मार्फत चौकशी केली जाणार आहे.

नगर उपविभागातील अमोल उर्फ संतोष ईश्‍वर पिंपळे (वय-21) यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. कैलास रामभाऊ गिरवले (वय-55), सोमनाथ आसाराम ठोंबे ( वय-33) यांचा न्यायालयीन कोठडीत व बाळू उर्फ शशीकांत अजिनाथ ससाणे यांचा ससून रुग्णालय, पुणे येथे उपचार दरम्यान मृत्यू झालेला आहे. या व्यक्‍तीच्या मृत्यूच्या कारणांची दंडाधिकारीय चौकशी करण्यासाठी नगर उपविभागीय दंडाधिकारी गाडेकर यांची नियुक्‍ती करण्यात आलेली आहे.

मयत व्यक्‍तीच्या ज्या कोणास या घटनेसंबंधी माहिती, पुरावे आणि दंडाधिकारी चौकशीस उपयोगी पडेल अशी माहिती उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे 6 ऑगस्ट पर्यंत सकाळी 11 वाजता लेखी स्वरुपात देण्यात यावी. माहिती देणाऱ्याने संपूर्ण नाव, वय व पूर्ण पत्ता मोबाईल क्रमांक व स्वतःची स्वाक्षरी करावी तसेच मृत्यू संबंधीच्या व दृश्‍याच्या बाबीचा सविस्तर मजकूर देण्यात यावा, असे गाडेकर यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.