जिल्हा युवक कॉंग्रेसची आढावा बैठक
नगर – जिल्हा युवक कॉंग्रेसच्या वतीने पक्ष कार्यालय येथे आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस प्रमुख पाहुणे प्रदेश युवक कॉंग्रेसचे प्रदेश युवक प्रभारी हरपालसिंह चुडासमा, प्रदेश अध्यक्ष सत्यजीत तांबे,नगरचे प्रभारी अकील पटेल, कार्याध्यक्ष सोमेश्वर दिवटे, नगर शहराध्यक्ष मयुर पाटोळे, युवक जिल्हाध्यक्ष निखिल पापडेजा,कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके,शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण,स्मितल वाबळे, राजू बोरुडे, तुषार पोटे, ऋषिकेश मुळे, अनिल धाडगे, मंगल भुजबळ, कुलदीप उमाप, नितीन खंडागळे, शरद पवार, संदीप दरंदले, अड अक्षय कुलट, मोहसीन शेख, मुबिन शेख , अनवर सय्यद आदींसह युवक पदाधिकारी व कॉंग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी आपापल्या मनोगत व्यक्त केले व प्रमुख पाहुणे प्रदेश युवक कॉंग्रेसचे प्रभारी हरपलसिंह चुडासमा म्हणाले गाव तेथे कॉंग्रेस करून कॉंग्रेस युवक आघाडी ही गावापासून शहरापर्यंत पोहोचवली पाहिजे व सर्वांनी एकजुटीने कार्य केले पाहिजे व सत्यजित तांबे युवक प्रदेश अध्यक्ष लाभले असल्याने कॉंग्रेस पक्ष हा तळागाळापर्यंत पोहोचले जाणार आहे.
व युवकांनाकॉंग्रेसमध्ये कार्य करण्याची संधी उपलब्ध होणार आहेत व लवकरच नगर शहराला जिल्हा अध्यक्ष निवड करण्यात येण्यात असल्याचे सांगितले कॉंग्रेसच्या माध्यमाने शहरांमध्ये रोजगार मेळावे युवकांसाठी घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयूर पाटोळे यांनी केले.