लोकसभा निवडणुकीत 30 टोळ्या होणार हद्दपार

जिल्ह्यातील साडेनऊ हजारांना प्रतिबंधात्मक कारवाईच्या नोटिसा

नगर: लोकसभा निवडणुकीत कायदा कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी 30 टोळ्यांविरूध्द हद्दपारीची सुनावणी पूर्ण झाली असून लवकरच त्यावर कारवाईचा आदेश काढले जाणार आहे. गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्ह्यातील महामार्गांवर 16 विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. तीस हजार जणांविरूध्द प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. 23 एप्रिल रोजी “नगर दक्षिण’ मतदारसंघासाठी तर 29 एप्रिल रोजी “शिर्डी’ लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली कडक उपाययोजना प्रशासनाकडून करण्यात येत आहे. या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील 1 हजार 517 जणांना शस्त्र जमा करण्याबाबत आदेश जारी करण्यात आले आहेत. यामध्ये जवळपास 70 टक्के राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आहेत. त्याचबरोबरच पोलिस दफ्तरी विविध गुन्ह्यांची नोंद असलेल्या गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू झाली आहे. आतापर्यंत 9 हजार 500 जणांविरूध्द प्रतिबंधात्मक कारवाईच्या नोटिसा देण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांनी सांगितले आहे.

सुमारे पाच हजार जणांना निवडणुकीच्या काळात जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी प्रांतधिकारी यांना देण्यात आले आहे. शहरातील संघटीत गुन्हेगारांच्या टोळ्यांवर कारवाई सुरू झाली आहे. गुन्हेगारांकडून इतर जिल्ह्यातून होणारी दारू वाहतुकीसह इतर गैरप्रकार होवून निवडणूक काळात कायदा, सुव्यवस्थेला धोका निर्माण होण्याची शक्‍यता लक्षात घेवून जिल्ह्याच्या हद्दीवर तपासणी नाके सुरू करण्यात आलेले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)