श्री गुरू गौतममुनी चॅरिटेबलमध्ये सुविधा
सहकारनगर – सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे श्री गुरू गौतममुनी चॅरिटेबल सेंटरला सामाजिक बांधीलकी जपत गरीब रुग्णांसाठी पाच मिनिटांमध्ये 22 प्रकारच्या प्राथमिक विविध तपासण्या करून तातडीने रिपोर्ट देणारे अद्ययावत यंत्र स्व. मोहनलालजी उमेदलालजी भंडारी यांच्या स्मरणार्थ संतोष भंडारी व परिवार यांच्यातर्फे भेट देण्यात आले.
अरण्येश्वर येथे सुरू करण्यात आलेल्या गुरू गौतममुनी चॅरिटेबलच्या माध्यमातून आजपर्यंत 30 हजार डायलिसिस माफक दरात व दुर्बल घटकांसाठी मोफत करण्यात आले आहेत. सेंटरच्या माध्यमातून सोनोग्राफी, टुडीइको, एक्सरे, पॅथॉलॉजी लॅब व डेंटल क्लिनिक सुरु करण्यात आले आहे.
चॅरिटेबलचे संस्थापक सतीश बनवट म्हणाले की, गरिबांना आरोग्याच्या दृष्टीने मदत होण्यासाठी त्यांच्या वर अल्पदरात उपचार होण्यासाठी चॅरिटेबल सेंटरची सुरुवात करण्यात आली छोटेसे लावलेले रोपटे आज वटवृक्षात रूपातंर होत असल्याचे पाहून आनंद वाटतो.
यावेळी गौतम गेलडा, प्रविण परदेशी, जीवन बेद, किशोर खाबिया, राहुल बोगवत, मनोज छाजेड, राजेंद्र चोपडा, नेमीचंद सोलंकी, नितीन नहार, सतीश बनवट, हेमंत भंडारी, वैभव सेटिया, संतोष भुरट, महेंद्र सुंदेचा मुथा, प्रकाश बोरा, भरत सुराणा, गिरीश सोलंकी, प्रकाश संचेती, सुनिल शाह आदी उपस्थित होते.