मुंबई : मशिदींवरील भोंग्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे चर्चेत आले होते. राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याचे त्यांनी स्वतः सांगितले होते. आता राज ठाकरे यांच्यावरील शास्त्रक्रिया पूर्ण झाली असून ते रुग्नालयातून घरी परतल्याची माहिती राज ठाकरे यांनी ट्विट करीत दिली आहे. राज ठाकरे यांच्या ट्विट नंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांना उद्देशुन एक ट्विट केले आहे त्यांचे ही ट्विट चांगलेच चर्चेत आले आहे.
@RajThackeray आपल्यावर यशस्वी शस्त्रक्रिया होऊन आपण घरी परतलात आपण लवकरच पूर्ण पणे बरे व्हाल हि आई भवानी कडे प्रार्थना
आपण मी कोरोनातं असताना माझ्या कन्येकडे आस्थेने विचारपूस केली होती हे मी विसरलेलो नाही
राजकारणात वाद असावेत द्वेष नाही #महाराष्ट्र_धर्म— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 25, 2022
राजकारणात वाद असावेत द्वेष नाही
जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हंटले आहे की , राज ठाकरे , आपल्यावर यशस्वी शस्त्रक्रिया होऊन आपण घरी परतलात आपण लवकरच पूर्ण पणे बरे व्हाल हि आई भवानी कडे प्रार्थना, आपण मी कोरोनातं असताना माझ्या कन्येकडे आस्थेने विचारपूस केली होती हे मी विसरलेलो नाही . राजकारणात वाद असावेत द्वेष नाही ” अशा आशयाचे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. हे ट्विट चर्चेत आले आहे.
— Raj Thackeray (@RajThackeray) June 25, 2022
काय आहे राज ठाकरे यांचे ट्विट ?
हिप बोन वरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर घरी पोहचल्यानंतर राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हण्टले आहे की , ” आपल्या आशीर्वादाने आणि प्रार्थनेने माझी शस्त्रक्रिया व्यवस्थितरित्या पार पडली. काही वेळापूर्वीच रुग्णालयांमधून बाहेर पडून मी घरी पोहोचलो आहे. आपल्या आशीर्वाद आणि प्रेम असेच कायम असो आपला नम्र राज ठाकरे. ” असे ट्विट राज ठाकरे यांनी केले आहे.