बाबराने केलेली ऐतिहासिक चूक सुधारण्याची संधी मिळाली पाहिजे

अयोध्या प्रकरणात हिंदुच्या वतीने सुप्रिम कोर्टात प्रतिपादन
नवी दिल्ली: बादशहा बाबर याने अयोध्येत राम मंदिरच्या स्थळावर मशिद बांधून केलेली ऐतिहासिक चुक सुधारण्याची संधी मिळाली पाहिजे, अयोध्येत अनेक अन्य मशिदी आहेत. मुस्लिम तेथे नमाज पडू शकतात पण हिंदु प्रभु रामचंद्रांची जन्मभूमी बदलू शकत नाहीत असे प्रतिपादन आज अयोध्या प्रकरणातील सुनावणीच्यावेळी हिंदुच्यावतीने त्यांचे वकिल के पराशरन यांनी केले आहे.

पराशरन हे माजी ऍटर्नी जनरलही आहेत. आज सरन्यायाधिश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील घटनीपीठा पुढे अयोध्या प्रकरणातील पुढील सुनावणी सुरू झाली. त्यावेळी त्यांनी हे प्रतिपादन केले.

ते म्हणाले की सम्राट बाबराने भारतावर आक्रमण करून प्रभु रामचंद्रांच्या जन्मस्थळावर मशिदीचे निर्माण केले. त्यांच्या या युक्‍तिवादावर कोर्टाने त्यांना अनेक प्रश्‍न विचारले. एका जागी मशिद उभारली असेल तर ती कायम स्वरूपी मशिदीचीच जागा असते असा मुस्लिमांचा दावा आहे त्यावर तुमचे मत काय असे विचारता पराशरन म्हणाले की हा दावा आम्हाला मान्य नाही.

उलट ज्या जागी मंदिर होते त्या जागी मंदिरच हवे अशी आमचीही भूमिका आहे. आज त्या जागेवर मशिद नसली तरी त्या जमीनवर आमचाच हक्क आहे असे मुस्लिमांचे म्हणणे आहे. त्या अनुषंगानेही त्यांना काही प्रश्‍न विचारण्यात आले. अयोध्य प्रकरणातील सुनावणीचा आज 39 वा दिवस होता.

Leave A Reply

Your email address will not be published.