‘कदाचित’ टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी टाटा नावाची व्यक्‍ती नसेल

नवी दिल्ली – टाटा ट्रस्टच्या भावी अध्यक्षपदावर कदाचित टाटा नाव नसलेली व्यक्‍ती असू शकते, असे टाटा ट्रस्टचे सध्याचे अध्यक्ष रतन टाटा यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले, असे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे.

मी सध्या टाटा ट्रस्टचा अध्यक्ष आहे. पुढील अध्यक्ष टाटा नावाचा असेलच असे नाही. व्यक्‍तीचे जीवन मर्यादित असते. मात्र, संस्थांचे जीवन अमर्यादित असू शकते. टाटा कुटुंबाचा टाटा ट्रस्टमध्ये हितसंबंधांचा वाटा नाही. सध्या टाटा सन्सच्या अध्यक्षपदावर एन. चंद्रशेखरन आहेत. त्यांचा आणि टाटा कुटुंबाचा कसलाही संबंध नाही.

टाटा समूहात किंवा टाटा ट्रस्टमध्ये टाटा नावाच्या व्यक्‍तीला वेगळे विशेषाधिकार देण्यात आलेले नाहीत. कंपनीचे भागधारक म्हणून जे काही हक्क आणि अधिकार आहेत तेवढेच टाटा कुटुंबीयांना मिळतात. टाटा सन्समध्ये माझे आणि माझ्या कुटुंबीयांचे केवळ तीन टक्के भागभांडवल असल्याचे एका याचिकेवरील प्रतिसादात रतन टाटा यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.