श्रद्धाबरोबर काहीही बिघडलेले नाही- परिणिती

साईना नेहवालच्या बायोपिकमध्ये आता श्रद्धा कपूरच्या जागेवर परिणिती चोप्राला घेतले गेले आहे. श्रद्धाची निवड झाल्यापासून या बायोपिकबाबत तिच्या अपेक्षा, तिने बॅडमिंटन शिकण्यासाठी केलेले कष्ट, साईना नेहवालबरोबरच्या बॉन्डिंगच्या बातम्या चर्चेत आल्या होत्या. मात्र आता परिणितीने या सिनेमाची पुन्हा पहिल्यापासून तयारी सुरू केली आहे. याच दरम्यान श्रद्धा आणि परिणितीमध्ये काही तरी बिनसल्यासारखे झाले आहे. आपला सिनेमा परिणितीने मिळवल्याची नाराजी श्रद्धाच्या मनात असावी. मात्र परिणितीने मात्र असे काहीही नसल्याचे स्पष्ट केले आहे.

हा सिनेमा परिणितीने स्वीकारण्यापूर्वीच तिने बॉलिवूडमध्ये श्रद्धा, सोनाक्षी आणि आलिया या आपल्या खूप चांगल्यामैत्रिणी असल्याचे म्हटले होते. श्रद्धाला आपल्याबद्दल काही आक्षेप असेल, असे परिणितीला वाटत नाही. अशा स्वरुपाची चर्चा बॉलिवूडमध्ये सारखी होतच असते. हिरोईनचे एकमेकींशी जरा कमीच पटते. पण सध्या बॉलिवूडमध्ये ऍक्‍टर किंवा ऍक्‍ट्रेसना एकमेकींबरोबर जुळवून घ्यावेच लागते. त्यामुळे श्रद्धाच्या नाराजीच्या बातमीमध्ये काही दम नाही, असे परिणिती म्हणाली. सध्या ती साईनाच्या बायोपिकच्या तयारीसाठी ती पहाटे 5 वाजता उठते आणि वर्कआऊट करते. सकाळी 6 वाजता बॅडमिंटन कोर्टवर जाऊन दोन तास कसून प्रॅक्‍टिसही तिला करावी लागते आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.