मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीत ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या बॉलिवूडमधील करिअरला 5 नोव्हेंबरला 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. अभिनयाशिवाय ते नेहमीच त्यांच्या ट्विटमुळे चर्चेत असतात. यातच बिग बी त्यांच्या ट्विटमुळे चर्चेत आले आहे.
T 3592 – नया साल आने में बस कुछ ही दिन बाक़ी हैं ; ज़्यादा परेशान होने की बात नहीं है , बस …. 19-20 ( उन्नीस बीस ) का ही फ़र्क़ है ??
— Amitabh Bachchan (@SrBachchan) December 27, 2019
नवीन वर्षाला ३ दिवस बाकी असतांना त्यांनी त्यांच्या ट्विटरवर मजेशीर अस ट्विट केले आहे. ‘T 3592 – नूतन वर्षाच्या सुरुवातीला बस काही दिवस बाकी आहे, जास्त चिंतित होण्यासारखी गोष्ट नाही, फक्त…. 19-20 चा फरक आहे.’ सध्या ट्विटरवर त्यांच्या या ट्विटला युजर्सकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, आगामी काळात त्यांचे ‘झुंड’, ‘गुलाबो सिताबो’, ‘ब्रह्मास्त्र’सारखे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.