Maharashtra Assembly Election 2024 । महाराष्ट्राच्या राजकीय दंगलीत पहिल्यांदाच 6 मोठ्या पक्षांचे सुमारे डझनभर मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत. मुख्यमंत्रीपदाचे सर्वाधिक उमेदवार महायुतीसह महाविकास आघडीतही दिसून आले आहे.
महायुतीतील भारतीय जनता पक्षात दोन असे चेहरे आहे जे भविष्यात मुख्यमंत्री होण्याची चर्चा आहे. यात भाजप पक्षाकडून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा होत आहे.
अशात या चर्चांवर नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत आपली भूमिका स्प्ष्ट केली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले,’आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय झाल्यास मुख्यमंत्रिपदासाठी कुठल्याही प्रकारची रस्सीखेच होणार नाही. अशा कुठल्याही व्यवस्थेसाठी कुठल्याही प्रकारची आश्वासने देण्यात आलेली नाहीत. कारण आमच्याकडे आधीपासूनच पुढचा मुख्यमंत्री निवडण्यासाठी एक पद्धत आहे. एकनाथ शिंदेंसह आमच्या युतीतील कुठल्याही नेत्याने पदाची मागणी केलेली नाही. सर्वांना विश्वास आहे की, निर्णय निष्पक्षपणे होईल, असे राज्याचे उपमुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.’