मुंबई – अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांमध्ये सत्यता नाही. मात्र उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर त्याचा सन्मान ठेवण्याची सरकारची जबाबदारी आहे. सीबीआय चौकशीदरम्यान पदावर राहणे योग्य नाही, अशी भूमिका अनिल देशमुख यांनी पक्षासमोर मांडली.
पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशमुख यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला असून अनिल देशमुख हे आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवतील, अशी प्रतिक्रिया कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.