सत्तास्थापनेबद्दल सोनियांशी चर्चा नाहीच; शिवसेनेची धाकधूक कायम

नवी दिल्ली : सत्तास्थापनेच्या वादातून भाजप काडीमोड झाल्यानंतर शिवसेनेनं आघाडीसोबत जात सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु केल्या आहेत. त्या अनुषंगानेच आज होणारी शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट महत्वाची ठरणार होती. परंतु हि बैठक संपल्यानंतर शरद पवारांनी पुन्हा शिवसेनेला गॅसवरच ठेवले आहे.

राज्यातील सत्तास्थापनेसंदर्भात दिल्लीत मोठ्या घडामोडी घडत आहेत. सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यात जवळपास ४५ मिनिटे बैठक झाली. या बैठकीनंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत सरकार बनविण्याबाबत आमची कोणतीही चर्चा झाली नाही. ही काँग्रेस-राष्ट्रवादीबाबत बैठक होती. त्यामुळे इतर कोणत्याही पक्षाबाबत बैठकीत चर्चाच झाली नाही असं सांगत शिवसेनेवर पुन्हा टांगती तलवार ठेवली आहे.

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, सोनिया गांधी यांच्यासोबत आमची बैठक झाली. महाराष्ट्राच्या सध्याच्या परिस्थितीवर सविस्तर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान अहमद पटेलदेखील उपस्थित होते. ही चर्चा झाल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होईल. याबाबत पक्षातील नेत्यांची मतं जाणून घेणार आहोत. महाराष्ट्रातील परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत असं त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.