मुंबई २४ जून, २०२१ : कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरली मालिका संपूर्ण महाराष्ट्राच्या मनामध्ये भरली असं म्हणायला हरकत नाही. यामधील काही पात्रांनी रसिक प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मालिकेतील काही कालाकारांमध्ये खूप चांगले नाते तयार झाले आहे.
View this post on Instagram
खूप वेळ एकत्र काम करत असल्याने सेटवर एकत्र राहून हे बॉंडिंग बऱ्याच कलाकारांमध्ये बघायला मिळतं. मालिकेचे शूट करत असताना सेटवरील काही कलाकारांमध्ये चांगली मैत्री होते, एकमेकांना चांगल्याप्रकारे ओळखू लागतात.
तसंच काहीसं इंदूच्या भूमिका साकारणार्या अतिशा नाईक आणि लतिका म्हणजेच अक्षया नाईक यांच्यामध्ये झालं. ऑनस्क्रीन सासू – सून नातं असलं तरीदेखील ते खूप सुंदर आहे आणि अगदीच तसेच ऑफस्क्रीन देखील त्यांचे नाते खूप छान आहे. इंदूसाररखी सासू, आई मिळावी आणि लतिका सारखी समजूतदार मुलगी, सून मिळावी असं सगळ्यांच्या मनामध्ये येऊन जातं.
View this post on Instagram
अक्षया यावर म्हणाली, “अतिशा ताई आणि इंदू यामध्ये खूप साम्य आहे. खूप मायाळू आहे, मदतीसाठी नेहेमी तयार असते. माझ्या कामात देखील मला तिचं मार्गदर्शन मिळत असतं. कसं माझं काम अजून चांगलं होईल यासाठी नेहेमी मला ती मदत करते. तिच्याकडे सगळ्या अडचणींवर उपाय असतात.
कुठल्याही गोष्टीला ती कधीच नाही म्हणत नाही. आम्ही सेटवर असो वा शूटिंग संपल्यावर खूप गप्पा मारतो, मला तिच्या रूपात चांगली मैत्रीण मिळाली असं म्हणेन मी. कधी कधी अतिशा ताई आम्हाला (लहान मुलांना) गोष्टी सांगते.
View this post on Instagram
दिवाळीला तिने आमच्यासाठी फराळासोबत एक पत्र दिलं होतं तेंव्हा खूप आनंद झाला होता. आम्ही सगळेच घरापसून लांब आहोत, पण आईची कमतरता ती असल्यामुळे भासत नाही इतक प्रेम करते.”