खेडमध्ये एकही संवेदनशील केंद्र नाही

प्रांताधिकारी संजय तेली : निवडणुकीसाठीप्रशासकीय यंत्रणा सज्ज

राजगुरूनगर- खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात प्रशासकिय यंत्रणा सज्ज झाली असून 379 मतदानकेंद्रांसाठी 3000 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. तालुक्‍यात एकही संवेदनशील केंद्र नसून निवडणूक काळात आयोगाने या सर्व घटनांवर बारकाईने लक्ष ठेवणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी संजय तेली व सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार सुचित्रा आमले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

संजय तेली म्हणाले की, निवडणूक आचारसंहिता व उमेदवारी अर्ज प्रक्रियेसंदर्भात सर्व राजकिय पक्ष नेते व कार्यकर्त्यांचे समुपदेशन केले जाणार असून त्यासाठी सोमवारी (दि.23) तहसील कार्यालयामध्ये सकाळी 11 वाजता बैठक आयोजित केली आहे. मतदार जागृती कार्यक्रमांतर्गत ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिनद्वारे संपुर्ण तालुक्‍यात प्रात्यक्षिके दाखवण्यात आली आहेत. “चुनाव पाठशाला’ अंतर्गत शाळा-महाविद्यालयांमध्ये मतदार जागृती सुरू आहे. यावेळी मतदानाच्या पाच दिवस अगोदर मतदारांना “व्होटर स्लीप’ वाटण्यात येणार आहेत.

उमेदवारांच्या प्रसिद्ध करणाऱ्या फ्लेक्‍स, पॅप्लेटसाठी व्यावसायिकांकडून मुद्रांक प्रकाशक नाव व घोषणा पत्र घेतले जाणार, निवडणूक खर्चासाठी स्वतंत्र बॅंक खाते उघडावे, उमेदवारांचे शासकीय येणे बाकी नसावे यासह तालुक्‍यात 5 फ्लाईंग व 2 सहफ्लाईंग स्कॉडची नियुक्ती करण्यात आली आहे. तालुक्‍यात 3 ठिकाणी चेक पोस्ट व स्थिर सर्वेक्षण पथक काम करणार आहे. सभा व आदी संबंधित परवानग्या ऑनलाइन दिल्या जाणार असून स्वतंत्र एक खिडकी सुरू केली जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

 • खेड-आळंदीमध्ये मतदार
  पुरुष : 1 लाख 70 हजार 514
  महिला : 1 लाख 55 हजार 937
  इतर : 4
  एकूण : 3 लाख 26 हजार 455
  लोकसभेपेक्षा आतापर्यंत तीन हजार मतदारांची वाढ झाली आहे.
Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here