अॅक्‍टर म्हणून कोणाकडेही रोड मॅप असत नाही

सिनेमात अॅक्‍टिंग करण्याच्या फिल्डमध्ये ग्लॅमर, पैसा, प्रसिद्धी सगळे काही मिळू शकते, मात्र हे सगळे मिळवण्यासाठी कोणताही एक राजमार्ग असू शकत नाही. यासाठी कोणतीही एक निश्‍चित रेसिपी असू शकत नाही. एकाला यशस्वी फॉर्म्युला मिळाला, म्हणजे तो फॉर्म्युला दुसऱ्यासाठीही यशस्वी होईलच असे काही सांगता येऊ शकणार नाही. त्यामुळे कोणत्याही एका रोड मॅपचा शोध घेणेच चुकीचे आहे, हे मत आहे “आशिकी 2’मधील आदित्य रॉय कपूरचे.

अॅक्‍टिंग हे एक अत्यंत असुरक्षित क्षेत्र आहे. एकदा का एखाद्या सिनेमाचे शुटिंग संपले की अभिनेत्याकडे कोणतेही काम उरतच नाही. त्यावेळी एकप्रकारचे रिकामेपण येते. त्यावेळी पुढील काम काय असावे, हे ठरवण्याशिवाय काहीही करता येऊ शकत नाही. पुढील पाच वर्षांनंतर आपण कोठे असू हे आताच सांगता येऊ शकत नाही. जशी संधी मिळत जाईल, त्याच प्रमाणे प्रवास करावा लागतो. “फितूर’ आणि “ओके जानू’नंतर रोमॅंटिक हिरोची इमेज मिळायला लागली होती. पण त्याच रोलची डिमांड करत बसणेही गैर आहे, हे आदित्यच्या लक्षात आले.

आता “कलंक’ आणि त्यानंतर “सडक 2′ मध्ये आदित्य आहे. आतापर्यंतच्या करिअरग्राफमुळे त्याला फारसे गणले जाऊ लागले नव्हते. त्यामुळे त्याला आपल्या सिनेमांचा ट्रॅक बदलायला लागला. नेहमीच जर एकछापाचे रोल करायला लागल्याने बॉलिवूडमध्ये जास्त काळ टिकणार नाही. आपण आपले कष्ट दिलेले असतात. आपल्या टीमने वेळ, पैसा, एनर्जी घातलेली असते. अशावेळी सिनेमा फ्लॉप झाला तर आपले तर नुकसान होईलच पण प्रॉडक्‍शन टीमचेही नुकसान होईल. हे टीकाकारांचे मत त्याने ग्राह्य धरले आहे. या टीकेमुळे आपले अॅक्‍टिंगवरचे प्रेम मात्र जराही कमी होऊ द्यायचे नाही, एवढे मात्र त्याने ठाम ठरवून टाकले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.