‘हा’ आजार झालेल्या रुग्णांना करोनाचा धोका नाही!

ब्राझीलमधील संशोधकांचा दावा

रिओ दि जानेरो – डेंग्यु झालेल्या रुग्णांना करोना होत नाही असा दावा येथिल संशोधकांनी व्यक्त केला आहे. किंबहुना डेंग्यु झालेल्यांच्या शरिरात रोगप्रतिकार शक्ती वाढीस लागत असल्याने करोनाचे विषाणू नष्ट होतात असेही या दाव्यात नमुद करण्यात आले आहे.

ब्राझीलमध्ये करण्यात आलेल्या एका पाहणीत डेंग्यू आणि करोना विषाणूमध्ये साधर्म्य आढळून आले आहे. डेंग्यूच्या तापामुळे करोना आजारापासून बचाव होत असल्याचे सांगितले जात आहे. डेंग्यूमुळे रोगप्रतिकारक शक्ती विकसित होत असून यामुळे करोनाच्या विषाणूंना अटकाव होत असल्याचा दावाही करण्यात आला आहे.

दोन वर्षातील डेंग्यूच्या तापासह करोना प्रसाराची तुलनात्मक आकडेवारी या पाहणीच्या आहवालात नमुद करण्यात आली आहे. देशातील ज्या भागांमध्ये डेंग्यूच्या आजाराची साथ आली होती त्या ठिकाणी करोनाचा संसर्ग अत्यंत कमी प्रमाणात आढळून आला आहे. त्यातूनच हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. 

डेंग्यूवर उपचार करताना देण्यात आलेली लस तसेच औषध करोनापासूनही बचाव करू शकते, असेही या दाव्यात म्हटले आहे. केवळ ब्राझीलमध्येच नाही तर दक्षिण अमेरिका, आशियातही हे दावे यापूर्वी केले गेले आहेत. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्युएचओ) यावर आक्षेप घेतला होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.