पुणे – शहरातील करोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी महापालिका आयुक्तांकडून पुणे शहराची संपूर्ण हद्द सील करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंदी घातली होती. त्यामुळे भाजी, दूध तसेच फळाच्या वाहनांनाही अडविण्यात येत होते.
मात्र, आता आयुक्तांनी या आदेशात बदल केला असून हे निर्बंध जीवनावश्यक वस्तु व सेवा (दूध व दुग्धोत्पादन, किराणा माल, फळे व भाजीपाला आदी) यांच्या वाहतुकीसाठी कोणतेही निर्बंध नसून त्यांना त्यासाठी कोणत्याही पासची आवश्यकता नसल्याचे महापालिका आयुक्तांनी नमूद केले आहे. जीवनावश्यक वस्तु विक्रेते तसेच इतर अत्यावश्यक सेवांशी संबंधित व्यक्तीबाबत पास देण्याबाबत परस्पर पुरक यंत्रणा निर्माण केली आहे, ती यापुढील मनाई कालावधीत तशीच चालु राहील.