बंगळुरू – कर्नाटकात नेतृत्व बदलाची शक्यता नाही. विद्यमान मुख्यमंत्री कुमारस्वामी हेच मुख्यमंत्रीपदी कायम राहतील असे स्पष्टीकरणे कर्नाटकातील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री सिद्धरामैया यांनी दिले आहे. कॉंग्रेस मधील अनेक आमदारांनी सिद्धरामैया हेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी जाहींर अपेक्षा व्यक्त केल्याने राज्यात राजकीय अस्वस्था निर्माण झाली होती त्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे प्रतिपादन केले. ते म्हणाले की कॉंग्रेसच्या काहीं जणांनी आपल्यावरील प्रेमापोटी ही अपेक्षा व्यक्त केली असावी पण त्यातून वेगळा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही.
पक्षाच्या काहीं जणांनी आपल्या नेत्याविषयी अशी जाहींर अपेक्षा करण्यात चूक काय असा सवालहीं त्यांनी आज पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. राज्यात 23 मेच्या निकालानंतर नेतृत्व बदल होईल काय असे विचारता ते म्हणाले की अशा बदलाचे कोणतेही संकेत नाहींत. कुमारस्वामी हे आमच्या आघाडीचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे येथे बदलाचे कारण दिसत नाहीं असे ते म्हणाले.