कॅन्टोन्मेंट हद्दीत पावसाचे पाणी जिरण्याची योजनाच नाही

पुणे – स्मार्ट कॅन्टोन्मेंट मानल्या जाणाऱ्या पुणे कॅन्टोन्मेंट परिसरातील रस्त्यांभोवती पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी कोणतीच सुविधा नसल्याने अनेकदा पावसाचे पाणी साचून राहते. बरेचदा ही परिस्थिती इतकी वाईट असते, की नागरिकांना गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागते. याचा फटका वारंवार बसत असून, यावर सक्षम उपाय करण्याची मागणी होत आहे.

सिमेंटचे चककीत रस्ते, दुतर्फा असलेली हिरवळ आणि साफसफाई…पुणे कॅन्टोन्मेंट परिसरातील बहुतांश भागांमध्ये हे चित्र पाहून या परिसराचा हेवा वाटतो. शहरातील इतर भागांमधील रस्तेही याचप्रकारचे असावे, असे अनेकदा वाटते, मात्र या चकचकीत दिसणाऱ्या रस्त्यांच्या भोवती पाणी वाहून नेण्यासाठी कोणतीही सक्षम व्यवस्था नाही. याबाबत स्थानिक नागरिक इक्‍बाल शेख म्हणाले, “मी नेहमी एम्प्रेस गार्डन रस्त्यामार्गे एमजी रस्ता असा प्रवास करतो. पावसाळ्यात बऱ्याचशा ठिकाणी पाणी साचल्याने वाहन चालवताना अडचणी येतात. बऱ्याचदा पथदिवे बंद असतात.’

Leave A Reply

Your email address will not be published.