मुंबई – देशभरात सध्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची चर्चा रंगताना दिसत आहे. 11 मार्च रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई करत आहे. चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत असून, त्यांचे कौतुक सुद्धा होत आहे. या चित्रपटावरुन रोज काही ना काही वक्तव्य आणि दावे केले जात आहेत.
‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट अनेक राज्यात करमुक्त करण्यात आला आहे. महाराष्ट्रातही हा चित्रपट करमुक्त करावा, अशी मागणी केली जात आहे. दरम्यान, आता शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले की… ‘द कश्मीर फाइल्स’ यासारखे चित्रपट करमुक्त करण्याची गरज नाही, कारण लोक स्वतः पैसे खर्च करून हा चित्रपट पाहत आहेत. कोणताही चित्रपट बनवण्याचा अधिकार निर्मात्यांना आहे आणि त्याचा वापर ते करत आहेत”, असे आमचे मत आहे.
‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट 1989 आणि 1990 च्या काळातील काश्मिरी पंडितांवर भाष्य करणारा आहे. काश्मिरी पंडितांनी भोगलेल्या वेदना, दुःख आणि संघर्षावर प्रकाश टाकण्याचे काम या चित्रपटातून झाले आहे. या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, दर्शन कुमार, चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, पुनीत इस्सार यांसारख्या तगड्या कलाकारांच्या भूमिका यामध्ये आहेत.