आघाडीत मनसे नाही

मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. त्या अनुषंगाने जागावाटपासंदर्भात आज काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये राज्यातील जागावाटपासंदर्भात चर्चा झाली. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादीने  आघाडीमधील मित्रपक्षांसाठी काही जागा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आघाडीमध्ये मनसेला स्थान दिले जाणार नसल्याचे काँग्रेस नेते आणि मुंबई प्रदेशाध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.

आजच्या बैठकीत महाराष्टातील विधानसभेच्या ६१ जागा निश्चित असून राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून २५० जागा लढवतील. तर मित्रपक्षांना 38 जागा सोडण्यात येतील, असे माहिती सूत्रांकडून मिळाली अहे.

परंतु आघाडीत मनसेला घेण्यात येणार नसल्याचे काँग्रेसच्या नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×